Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी ‘क’ पदांसाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रीयेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्ता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती ची जाहिरात हि पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0169 रिक्त जागा
भरती विभाग : पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका/उत्तीर्ण असणे आवश्यक. ii उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 1000/- रुपये व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. (ऑनलाईन मोड द्वारे फक्त परीक्षा शुल्क आकारले जाईल, व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर एक ई-पावती तयार होईल. उमेदवारांनी ई-पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटऑऊट घेणे आवश्यक आहे.)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 38,600/- रुपये ते 1,22,800/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र (Jobs In Pune)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 सप्टेबर 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांक व वेळेनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- अर्जात हेतूपरस्पर खोटी माहिती देणे किवा खरी माहिती दडवून ठेवणे किवा त्यात बदल करणे किवा पाठविलेल्या दाखल्याचा प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे किवा खाडाखोड केलेले वा बनवट दाखले सादर करणे परीक्षा कक्षातील गैरवर्तन परीक्षेचे वेळी नक्कल करणे वशिला लावण्याचा पर्यंत करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाचे बाहेर अथवा परीक्षेनंतरही गैरवर्तन करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे विशिष्ठ किवा सर्व परीक्षांना वा निवडीना अपात्र ठरविणे यापैकी योग्य त्या शिक्षा करणेचा तसेच प्रचलित फायदा व नियामचे अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार मा.महापालिका आयुक्त यांना राहील.
- प्राप्त अर्जाचा संख्येचा विचार करून निवड प्रक्रियेचा स्वरूप ठरविण्याचे अधिकार मा.महापालिका आयुक्त व मा.कर्मचारी निवड समिती यांना राहतील.
- नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वताच करणे आवश्यक आहे.
- अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रीयेसाठी अर्ज इंग्रजी मध्ये भरणे आवश्यक आहे.
- महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
- एस.एस सी अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावांप्रमाणे अर्ज भरावेत, त्यांनतर नाव बदलेले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्यासाबंधित बदलासंदर्भात राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी.
- वरील कार्यपद्धती हि अर्ज करण्याची योग्य पद्धत आहे या शिवाय दुसऱ्या पद्धतीने केलेले अर्ज हे अवैध ठरविण्यात येईल.
- उमेदवाराने अर्जात स्वताचे नाव , सामाजिक प्रवर्ग कोणत्याही प्रवर्गातील अर्ज करू इच्छिता आहे,तो प्रवर्ग जन्म दिनांक भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी. सदर माहिती चुकल्यास त्यास पुणे महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.
- विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्ज संगणकीय प्रणालीमध्ये स्वीकृत केला जाणार नाही.
- परीक्षेचा वेळी उमेदवारांने प्रवेशपत्र प्रिंट व ओळखीचा पुरावा सोबत ठेवणे बंधनकारक आहे, त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षेस बसण्यात परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वतः जवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेश पत्र व ओळखीचा पुराव्याची छायाप्रत जमा करावी.
- परीक्षा घेणाऱ्या संस्थाच्या धोरणानुसार परीक्षेनंतर कोणत्याही परीस्थित उम्वाराना सोडविलेल्या प्रश्नपत्रिकेचा संच दिला जाणार नाही तसेच फक्त उमेदवारास त्याचे मागणीनुसार Answer Key दिली जाईल.
- परीक्षेची वेळ दिनांक ठिकाण, परीक्षेचे प्रवेशपत्र याबाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
- प्राप्त अर्जाची संख्या लक्षात घेता परीक्षेची वेळ, दिनांक व ठिकाण यामध्ये बदल होऊ शकतो, याबाबत अर्जदारांची तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
- अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रीयेसाठी अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
- सदर परीक्षा स्थगित करणे,रद्द करणे अंशतः बदल करणे पदांच्या एकूण संखे मध्ये बदल करण्याचा अधिकारी नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवला आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे पण वाचा : Punjab and Sind Bank Bharti 2025 : पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत 0750 जागांची भरती सुरू ! त्वरित आवेदन करा.
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.