नमो शेतकरी योजनेचा 7वा हफ्ता या तारखेला ! येथे संपूर्ण माहिती पहा ! Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025 : नमो शेतकरी योजना नेमकी काय ? तर या लेखात आपण या योजना संदर्भात सगळी माहिती येथे उपलब्ध आहे, प्रधान मंत्री सन्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाते, आता महाराष्ट्र शासनाअंतर्गत हि नमो शेतकरी योजना राबविण्यात आली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6000/- रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्र सरकार च्या धरतीवर राज्य शासनाने हि योजना तयार केली असून शेतकऱ्यांना प्रती वर्षी 6000 रुपयाची मदत होते.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

नमो शेतकरी योजना नेमकी कुणाला मिळते?

नमो शेतकरी महास्न्मान निधी योजनेचा लाभ फक्त प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचे जे लाभार्थी आहेत, म्हणजेच, जे शेतकरी केंद्राच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत, तेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांना दोन्ही योजनांमधून मिळून दरवर्षी एकूण 12,000 रुपये मिळतात. (नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.)

आता पर्यंत नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी किती ?

नमो शेतकरी योजनेचा विचार केला असता महाराष्ट्र राज्यातील सुमारे 96 लाख पात्र शेतकरी या योजनेचे लाभ घेत आहेत.

सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना एकूण 06 हफ्ते मिळाले असून असून पात्र शेतकरी 07 हफ्त्याचे वाट आतुरतेने पाहत आहेत,आणि या हफ्त्या चा GR सुद्धा दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे, या GR मध्ये सन 2023-24 च्या अर्थ संकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी सन्मान निधी हि योजना घोषित करण्यात आली आहे.

नमो शेतकरी योजना 7 वा हप्त्याचा शासन निर्णय

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हफ्त्याचा (माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1932.72 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. (थोडक्यात सांगायचे तर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. रकमेत कोणताही बदल झालेला नाही, वार्षिक मदत 12,000/- रुपयांचीच राहील. शेतकऱ्यांनी अफवांपासून सावध राहून, आपले बँक खाते आणि ई-केवायसी तपशील अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.)

नमो शेतकरी योजना पात्र शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना

  • eKYC प्रक्रिया : शेतकऱ्यांनी आपली eKYC (electronic Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपूर्ण eKYC मुळे अनेकदा लाभ मिळण्यास विलंब होतो.
  • बँक खाते आणि आधार लिंक: आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आणि अद्ययावत असणे बंधनकारक आहे. बँक खात्याची माहिती आणि आधारशी जोडणी तपासण्यासाठी बँकेशी संपर्क साधा.
  • समस्या निवारण: जर तुम्हाला कुठलीही समस्या येत असेल, तर त्वरित MahaDBT पोर्टल किंवा तुमच्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील.
  • अधिकृत माहिती: योजनेबाबतची कोणतीही माहिती फक्त कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा शासनाच्या अधिकृत घोषणांमधूनच घ्यावी.

नमो शेतकरी योजना लाभार्थी स्टेट्स कुठे चेक कराल ?

Beneficiary Statusयेथे क्लिक करा

Namo Shetkari Yojana Status बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहे १) मोबाइल नंबर २) रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा उदाहरणासाठी आम्ही रेजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला आहे. त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा.शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती आणि Fund Disbursed Details येईल यार तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या Instalment ची माहिती मिळेल.

नमो शेतकरी योजना नोंदणी होते का ?

नमो शेतकरी योजने साठी तुम्हाला रेजिस्ट्रेशन करण्याची आवशक्यता नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सम्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकरऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, जर का तुम्ही पीएम किसान सम्मान निधी योजने साठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून यो दोन्ही योजनांचा लाभ घ्या. (पीएम किसान योजनेची नोंदणी असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटेल, आणि ज्या उमेदवारांची नोंदणी नसेल त्यांनी करूया खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी करावी, त्यानंतर तुम्हाला पीएम किसान चा हफ्ता मिळाल्यानंतर ऑटो तुम्हाला योजेनेचा लाभ हस्तांतरित केला जाईल.)

पीएम किसान नोंदणीयेथे क्लिक करा

नमो शेतकरी योजना अंतर्गत अडचण आली तर ?

जर कोणाला हप्ता मिळण्यात अडचण आली, किंवा वेबसाइटवर माहिती सापडत नसेल, तर जवळच्या सेवा केंद्रात (CSC), महसूल कार्यालयात किंवा सेतू केंद्रात जाऊन अधिक माहिती घेता येते. तिथे सरकारी कर्मचारी पूर्ण मार्गदर्शन करतात.

नमो शेतकरी योजनेविषयी अधिक माहिती साठी (https://pmkisan.gov.in/) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

हे पण वाचा : Punjab and Sind Bank Bharti 2025 : पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत 0750 जागांची भरती सुरू ! त्वरित आवेदन करा.

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.