Maharashtra Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 : नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य,पुणे कार्यालय अंतर्गत विविध पदांवर नेमणूक करावयची आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती साठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 : The Inspector General of Registration and Controller of Stamps, Maharashtra State, Pune Office is to be appointed to various posts. Interested and eligible candidates are invited to apply for this. The advertisement for this recruitment has been published by the Department of Registration and Stamps.
Maharashtra Nondani Mudrank Vibhag Bharti 2025
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा भरण्यात येतील.
भरती विभाग : नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य,पुणे
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
⚠️ उमेदवारांसाठी महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
पदांचे नाव : सनदी / लेखापाल
शैक्षणिक पात्रता : सनदी लेखापाल (Chartered Accountant) पदवी धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
संपूर्ण जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नोकरी चे ठिकाण : पुणे (Jobs In Pune)
वयोमर्यादा : –
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
भरती चा कालावधी : करार पद्धतीने नियुक्ती देताना 03 महिनेसाठी नियुक्ती देण्यात येईल, कामकाज व आवश्यकता विचारात घेऊन आवश्यकतेनुसार नियुक्तीचे नुतीनीकरण करण्यात येईल.
निवड प्रक्रिया : सदर भरती साठी मुलाखत द्वारे निवड प्रक्रिया केली जाईल.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : मा.नोंदणी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य,पुणे तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे – 411 001
मुलाखती चा दिनांक : 11 ऑगस्ट 2025 (सकाळी 11.00 वाजता)
मुलाखतीचा पत्ता : मा.नोंदणी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य,पुणे तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे – 411 001
अर्जासोबत खालील प्रमाणपत्रे स्वयंसाक्षांकित करून जोडावीत.
- शैक्षणिक अहर्ता धारण व इतर परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबतच्या छायांकित प्रती.
- अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो छायांकित करून चिकटवावा.
- आधार व पन कार्ड प्रत
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- नमूद करण्यात आलेले पदांचे कामकाज करण्यास उमेदवार सक्षम असणे आवश्यक आहे.
- कंपनी विलिनीकरण शेअस विमा इ. यांचे मुल्यांकन याबाबतचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवार यांना पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे.
- नियुक्त करावयची उमेदवार इतर व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा.
- मुलाखतीस उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना स्वतंत्र पने कळविण्यात येणार नाही.
- मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
- मुलाखतीस उपस्थित न राहिल्यास निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
- उमेदवारांचा मुलाखती घेऊन तसेच शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील.
- करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले उमेदवार हे नोंदणी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहतील.
- करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले उमेदवार यांना सोपविण्यात येणाऱ्या कामाचे स्वरूप नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे अंतिम राहतील.
- निवड झालेल्या उमेदवारांना विहित केलेल्या नमुन्यात हमीपत्र द्यावे लागेल.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 055 जागांची भरती l वेतन : 45,000 रुपये l Divisional Commissioner Office Bharti 2025