सरळसेवा भरती : कृषी उत्त्पन्न बाजार समिती भरती 2025 ! पात्रता : 10वी ते पदवीधर ! Krushi Utpann Bajar Samiti Bharti 2025

Krushi Utpann Bajar Samiti Bharti 2025 : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 019 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासात इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात हि कृषी उत्पन्न बाजार समिती (Krushi Utpann Bajar Samiti) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे, तसेच या भरती मध्ये 10वी/12वी/पदवीधर व इतर उमेदवारांना संधी मिळणार आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Krushi Utpann Bajar Samiti Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 019 रिक्त जागा

भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती (Krushi Utpann Bajar Samiti)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन (Maharashtra Government)

पदांचे नाव : उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, माळी, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता :

  • उपसचिव : शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT (कृषी पदवी प्राधान्य)
  • निरीक्षक : शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
  • सुपरवायझर : शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
  • कनिष्ठ लिपिक : शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT, टंकलेखन (मराठी 30 प्रती/इंग्रजी प्रती 40 सदर प्रमाणपत्र नसल्यास दोन वर्षाच्या कालावधीत सादर करता येईल.)
  • शिपाई : पात्र उमेदवार हा 10वी (SSC) उत्तीर्ण आवश्यक.
  • पहारेकरी : पात्र उमेदवार हा 10वी (SSC) उत्तीर्ण आवश्यक.
  • माळी : पात्र उमेदवार हा 10वी (SSC) उत्तीर्ण आवश्यक.
  • कनिष्ठ अभियंता : शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची स्थापत्य पदविका किवा पदवी असणे अनिवार्य आहे.
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा

वयोमर्यादा : उपरोक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी दिनांकास अराखीव प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष ते कमाल वर्ष 38 वर्ष राहील, मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्ष वय शिथिल राहील.

परीक्षा शुल्क :

  • राखीव प्रवर्गाकरिता – 400/- रुपये + 18%GST असे एकूण 472/- रुपये
  • अराखीव प्रवर्गाकरिता – 600/- रुपये + 18%GST असे एकूण 708/- रुपये

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 46,600/- रुपये मासिक वेतन श्रेणी मिळेल.

नोकरीचे ठिकाण : अमळनेर (जळगाव) Jobs in Amalner

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 सप्टेंबर 2025 (सायंकाळी 11:59 वाजेपर्यंत)

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सर्व पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
  • उमेदवार हा एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गसाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र शुल्क भरणे बंधन कारक राहील.
  • पात्र उमेदवाराने कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे www.apmcamalner.in या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपाने पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारण्यात येतील, इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
  • उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा, संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी, सदरील अर्ज उमेदवाराने स्वतः जवळ निवड प्रकियेसाठी जतन करून ठेवावा. सदरील अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणी साठी स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
  • अर्ज करताना उमेदवारांनी valid असलेल्या मोबाईल क्रमांक व इमेल आयडी सक्रीय असायला हवा, तसेच मोबाईल क्रमांक हा DND Active नसावा संदेश वाहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे sms ईमेल उमेदवार पर्यंत पोहचू शकन नाही, त्याकरिता कृषी उत्त्पन्न बाजार समिती अमळनेर जबाबदार राहणार नाही.
  • उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा हि कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांची पूर्व तपासणी / छाननी न करता घेण्यात येणार आहे, त्यामुळे परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडी बाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही, किवा त्याबाबत उमेदवाराला तक्रार करता येणार नाही,यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचण किवा शंका निर्माण झाल्यास संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून मदत घ्यावी.
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रीयेसाठी अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
  • सदर परीक्षा स्थगित करणे,रद्द करणे अंशतः बदल करणे पदांच्या एकूण संखे मध्ये बदल करण्याचा अधिकारी नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवला आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका अंतर्गत 0169 पदांची भरती सुरु ! Pune Mahanagarpalika Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.