कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 049 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 049 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती मध्ये 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 049 रिक्त जागा 

भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali Mahanagarpalika)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी / Full-time Medical Officer 018
02  अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part-time Medical Officer 018 
03  बालरोगतज्ञ / Pediatrician 01 
04 स्टाफ नर्स पुरुष / Staff Nurse Male 05 
05  क्ष-किरण तंत्रज्ञ / X-Ray Technician 02 
06  OT सहाय्यक / OT Assistant 02 
07  सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / Public Health Manager 02
08  शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक / City Quality Assurance Coordinator 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.01 : MBBS + अनुभव
  • पद क्र.02 : MBBS (ii) स्पेशलायझेशन (स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ) पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.03 : MD Pead/DCH/DNB
  • पद क्र.04 : i) 12वी उत्तीर्ण ii) GNM कोर्स
  • पद क्र.05 : i) 12वी उत्तीर्ण  ii) रेडिओग्राफर & क्ष-किरण डिप्लोमा
  • पद क्र.06 : i) 12वी उत्तीर्ण ii) OT टेक्निशियन डिप्लोमा
  • पद क्र.07 : M.B.B.S किंवा B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S/ B.P.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.PHARM/+MPH/ MHA/MBA (Health Care Administration)
  • पद क्र.08 : i) MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS) ii) MPH/MHA/MBA(Health Care Administration)

(अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेला उमेदवारांकडे जाहिराती मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अहर्ता असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी नियुक्तीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अहर्तेचया मुळ गुणपत्रिका सादर न केल्यास सदरील उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल. पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापिठातून प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. )

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

संगणक अहर्ता : MS-CIT / GOVT. Computer Course Or Diploma प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा नमूद करावा.

वयोमर्यादा : अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच दि. 31 जानेवारी 2025 रोजी उमेदवारांचे वय जाहिरातील विहित केलेल्या वयोमार्यादेत असणे आवश्यक आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी यांचे वयोमर्यादा 70 वर्ष व रुग्णसेवेशी संबंधित इतर पदांची वयोमर्यादा 65 वर्ष राहील. वयाच्या 60 किवा त्यापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कडून प्राप्त केलेले शारीरिक दृष्टा व मानशिक दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 17,000/- रुपये ते 75,000/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 11 महीने व 21 दिवस कालावधीसाठी करार पद्धतीने एकत्रित मानधनावर म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : i) सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार / गुणांकण पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल, या संदर्भात सर्व अधिकारी मा. अध्यक्ष निवड समिति यांच्याकडे राखून ठेवले आहेत. ii) उमेदवारांची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार गठित करण्यात आलेल्या समिति यांच्या मान्यतेने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई यांच्या दि. 17/03/2022 रोजी पत्रानुसार निकष लाऊन उमेदवारांची निवड गुणांकण पद्धतीने करण्यात येईल. iii) उमेदवार निवडताना उमेदवारांचे गुणांकण पदवी/पदविका परीक्षेतिल अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अहर्ता विचारात घेऊन निवड प्रक्रिया करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : कल्याण डोंबिवली 

मुलाखतीचा दिनांक : 24 & 25 एप्रिल 2025

मुलाखतीचे ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे.

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात / ऑफलाईन अर्ज  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक रा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सूचना व माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल,या करीता उमेदवारांनी www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणे आवश्यक राहील,पदभरतीच्या अनुषनगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही. 
  • जाहिरातीती नमूद केलेले पद हे पूर्णता कंत्राटी स्वरूपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही या पदाचा राज्यशासनाच्या काहीही संबंध नसून उमेदवार राजशासनाच्या नियमित पदांवर समायोजन करण्याची मागणी करू शकणार नाही. 
  • जाहिरातीत नमूद केलेले पदांचे वेतन हे एकत्रित ठोक मानधन आहे.
  • थेट मुलाखतीकरीता इच्छुक उमेदवारांनी फॉर्म सोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत. 
  • उमेदवाराने थेट मुलाखतीच्या वेळेस अर्जासोबत मुळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती सादर करणे बंधनकारक आहे.
  • संकेत स्थळावरील विहिती नामुन्यातील अर्ज व त्या संबधित कागदपत्रे वरील अटी व शर्तीनुसार मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावयाचे आहे.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

आवश्यक कागदपत्रे : 

  • वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज पूर्ण माहिती भरलेला फॉर्म ची प्रिंट
  • वयाचा पुरावा
  • पदवी / पदविका प्रमाणपत्र
  • गुणपत्रिक
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • सध्याचा पासपोर्ट फोटो
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • फौजदरी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

(टीप : ज्या दिवशी ज्या पदांसाठी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली असून त्या पदांसाठीचे अर्ज सकाळी 9.00 ते 10.00 वाजेपर्यंत उपस्थित असणाऱ्या उमेदवारांकडून स्वीकारण्यात येतील. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

अर्ज भरण्याबाबतच्या सूचना : 

  • उमेदवाराने स्वत: पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  • माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
  • जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवारांचे वय अचूक नमूद करावे.
  • अर्जात उमेदवारांचे लिंक या बाबतची माहिती नमूद करावी.
  • अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र अर्जासोबत करणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये उमेदवाराने स्वतच्या वैध ईमेल आयडी / पर्याय ई मेल आयडी चालू भ्रमणध्वनिचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदरील ई-मेल आयडी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू ई-मेल व संकेतस्थळवरील माहिती वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास आहे,किवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आवश्यक आहे.
  • उमेदवाराने आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा.
  • उमेदवाराने आपला सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा.

हे पण वाचा : NHM Satara Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा आरोग्य सातारा अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा