Home guard Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यात होमगार्ड मध्ये नविन रिक्त असलेले पदे भरण्यासाठी तब्बल 9700 जागा भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये पात्रता निकष पूर्ण करण्याऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावयची आहे. सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र होमगार्ड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf सविस्तर खाली दिली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Home guard Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)
एकूण पदसंख्या : 9700 रिक्त पदे
भरती विभाग : महाराष्ट्र होमगार्ड संघटना यांच्या द्वारे
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | होमगार्ड | 9700 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे कमीत कमी 20 वर्ष ते जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत असावे.
शारीरिक पात्रता :
- उंची : पुरुषांकरिता – 162 से.मी. महिलांकरिता – 150 से.मी.
- छाती : न फुगविता 76 से.मी. (फक्त पुरुषांकरिता)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570/- रुपये कर्तव्य भत्ता 100/- रु. भोजनभत्ता – 100/- रुपये दिला जातो.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in all Maharashtra)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : प्रत्येक जिल्हानुसार वेगवेगळी आहे.(येथे पहा)
Home guard Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्र :
- रहिवासी पुरावा – आधार कार्ड,मतदान कार्ड ओळखपत्र अनिवार्य
- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
- जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
- तांत्रिक अहर्ता धारणकरिता तत्सम प्रमाणपत्र
- खाजगी नोकरी करिता असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र
- 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे भरवायचा आहे.
- अर्ज भरणे पूर्वी दिलेली माहिती पत्रक ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी या भाषेमध्ये भरवायची असून माहिती भरताना अचूक व काळजीपूर्वक भरवायची आहे.
- उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे,तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस त्याने अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये अर्ज दाखल करता येईल.इतर जिल्हातील अर्ज बाद ठरतील.
- अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनू मध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढावायची आहे.त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्मानातील फोटो चिटकवावा,मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनानी लिहावायचे आहे. इतर कोणतेही माहिती उमेदवारांनी भरू नये.
- कागदपत्र पडताळणी व शारीरिकक्षमता चाचणी करिता येताना वरील दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात,अर्ज नोंदणीच्या दिवसी स्वतः घेऊन यावे.दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करिता बंधनकारक राहील.
- उमेदवारांना नोंदणी करता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. नोंदणी दरम्यान किवा प्रवासा दरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवारांची राहील.
- पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागानुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचा बाबतीत वयाने जेष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तार शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमापात्राच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येईल.
- अंतिम गुणवत्ता यादी महाराष्ट्र होमगार्ड संघटना यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येईल.
- वरील माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
🔴 हे पण वाचा : RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलाइजर्स लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! त्वरित आवेदन करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !