BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 1846 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये “कार्यकारी सहायक” (लिपिक) हे पद असून उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरती ची जाहिरात ही बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,संपूर्ण जाहिरात व अधिकृत वेबसाईट दिली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BMC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 1846 रिक्त पदे
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कार्यकारी सहायक (लिपिक) | 1846 |
शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही संस्थेतून/ विद्याशाखेतून 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवीधर उत्तीर्ण ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्गासाठी उमेदवारांना 1000/- रुपये व मागासवर्गीय उमेदवारांना 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / टायपिंग टेस्ट
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in Mumbai)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 21 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 ऑक्टोंबर 2024
BMC Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यापूर्वी हे वाचा : दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी सार्वजनिक वृत्तपत्रात व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिराताच्या अनुषंगाने 20/08/2024 ते 09/09/2024 पर्यतच्या कालावधीत कार्यकारी सहायक पदांसाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यक नाही.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !