Mahajyoti CET Form 2025 : महाराष्ट्र मधे शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि मुलींसाठी शाळा सुरू करणाऱ्या सावित्री बाई फुले यांनी समाजासाठी जे कार्य केले ते कार्य अविरत चालू राहावे आणि यातून शैक्षणिक समाजकार्य घडावे यासाठी Mahajyoti ची स्थापना करण्यात आली आहे. Mahajyoti या स्वायत्त संस्था द्वारे इतर मागासवर्गीय OBC, विमुक्त जाती VJ, भटक्या जमाती NT तसेच विशेष मागास वर्ग SBC या समाजातील जनतेचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी Mahajyoti या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. महाज्योती ही स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंद पेठ नागपूर येथे उभारण्यात आले आहे.
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
Mahajyoti CET Form 2025 Details
MAHAJYOTI प्रमुख उद्दिष्टे:
OBC, VJ, NT आणि SBC प्रवर्गातील लोकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कतिक उपक्रम राबवून त्यांची वाटचाल संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकासाच्या दिशेने व्हावी असे प्रयत्न केले जातात.
या स्वायत्त संस्था द्वारे, विविध रोजगार मेळावे आयोजित करणे आणि त्याद्वारे कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, तरुणांची औद्योगिक क्षमता वाढवणे, विविध क्षेत्रांचा संशोधनात्मक अभ्यास करून त्याची माहिती गोळा करून त्यांचे व्यवस्थापन करणे असे उपक्रम राबविले जातात.
शेतकऱ्यांची मुले, ग्रामीण भागात राहणारी मुले, महिला यांना शिक्षण क्षेत्रातील विविध संधी यांची ओळख करून देणे, मार्गदर्शन करून त्यांचे समुपदेशन करणे यासाठी विविध स्तरावर विविध केंद्रे सुद्धा उभारली जातात.
पर्यावरण जागृती निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून संशोधन कडे कल वाढवणे, सामाजिक आणि जातीय समानता प्रस्थापित करणे, लिंगभेद दूर करणे, समाजात पसरत जाणारी अंधश्रध्दा दूर करणे इत्यादी समाज कार्ये या संस्थे मार्फत केली जातात.
महिलांसाठी शिक्षणाची व्यवस्था करून देणे, त्यांच्या वर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणे, हुंडा बंदी, घरगुती अत्याचार यावर प्रतिबंध करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, जनजागृती करणे इत्यादी कामे या संस्थे मार्फत केली जातात.
Mahajyoti चे मुख्यलय हे नागपूर येथे असून त्यांचे विभागीय कार्यालय औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, अमरावती येथे उभारण्यात आले आहेत.
Mahajyoti च मुख्य उद्देश्य OBC, VJ, NT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात मजबूत बनवणे आणि संशोधन कडे त्यांचा उत्साह वाढवणे यासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
त्यात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC इत्यादी स्पर्धात्मक परीक्षा करीता पूर्व प्रशिक्षण दिले जाते.
तसेच रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी रोजगार मेळावा, कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी PhD आणि Mphil करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृती fellowship दिल्या जाते.
एकंदरीत तरुणांना भविष्यात येणाऱ्या स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवले जाते तेपण अगदी मोफत.
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात -pdf | येथे क्लिक करा |
MAHAJYOTI Scheme for UPSC Aspirants/ UPSC ची तयारी करीता महाज्योती कडून सुविधा:
- केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ची तयारी करणाऱ्या OBC, VJ, NT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेची पूर्वतयारी ही मोफत ऑनलाईन आणि अनिवासी पद्धतीने महा ज्योती मार्फत केली जाते. त्यासाठी दरवर्षी online पद्धतीने अर्ज मागविले जातात.
- यात एकूण १००० विद्यार्थ्यांची निवड ही या प्रशिक्षणासाठी केली जाते. तसेच प्रशिक्षण कालावधी हा ११ महिन्यांचा असतो. जर विद्यार्थ्यांची ७५% उपस्थिती असेल तर त्यांना दरमहा १०,००० विद्यावेतन दिले जाते. आणि आकस्मिक निधी म्हणून १२,००० रुपये दिले जातात. प्रशिक्षणाचे ठिकाण हे पुणे असून संपूर्ण माध्यम मराठी असते.
थोडक्यात,
- प्रशिक्षण करीता एकूण विद्यार्थी संख्या = १०००
- प्रशिक्षण कालावधी = ११ महिने
- विद्यावेतन (७५% उपस्थिती असेल तर)= १०,०००
- अकस्मिक निधी = १२,०००
- प्रशिक्षण ठिकाण= पुणे (माध्यम – मराठी)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता:
- विद्यार्थी महारष्ट्र चा रहिवासी असावा.
- विद्यार्थी हा OBC, VJ, NT किंवा SBC या प्रवर्गातील च असावा.
- पात्र विद्यार्थी नॉन क्रिमी लेय्यर उत्पन्न गटात मोडणार असावा.
- विद्यार्थ्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थि सुद्धा यासाठी पात्र ठरू शकतात.
- महा ज्योती मधून एकदा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने पुन्हा याकरिता अर्ज करू नये तो ग्राह्य धरल्या जाणार नाही.
- विद्यार्थ्यांची शेवटची अंतिम निवड छाननी परीक्षा मधून केली जाईल.
- या योजने करीता विद्यार्थ्यांचे किमान वय २१ वर्षे तर कमाल वय ३५ वर्षे पेक्षा जास्त असू नये. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता वय मर्यादा ३७ वर्षे ठेवण्यात आली आहे.
प्रवर्ग नुसार लाभार्थी निवड संख्या आणि निवड प्रक्रिया:
- या योजनेत खालील प्रमाणे प्रवर्ग नुसार विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवल्या जातात. सर्वात जास्त जागा ह्या OBC प्रवर्ग करीता असल्याचे आपणास दिसून येते.
- OBC: 590 (59%)
- VJ A: 100 (10%)
- NT B: 80 (8%)
- NT C: 110 (11%)
- NT D: 60 (6%)
- SBC: 60 (6%)
समांतर आरक्षण
- प्रवर्ग निहाय महिलांना ३०% आरक्षण असेल.
- दीव्यांग उमेदवार करीता ४% जागा आरक्षित असतील.
- आणि अनाथ साठी १% जागा आरक्षित असतील.
निवड प्रक्रिया :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने महाज्योतीच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
- प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची दिलेल्या निकष नुसार छाननी केल्या जाते.
- अर्ज छाननी नंतर दिलेल्या स्पर्धा परीक्षा च अभ्यासक्रमावर आधारीत एक चाळणी परीक्षा घेऊन त्यातून गुणवत्ता धारक आणि जागा आरक्षण नुसार विद्यार्थी निवड करण्यात येतील आणि ती यादी संकेत स्थळावर लावण्यात येईल.
प्रशिक्षण स्वरूप:
- परीक्षेच्या अभ्यासक्रम नुसार विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाईल.
- प्रशिक्षण घेण्यासाठी दिलेल्या ठिकाणी निवास करणे आवश्यक असेल(अनिवासी स्वरूप).
- म्हणजेच प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीचे असेल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- १.) आधार कार्ड
- २.) जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- ३.) रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- ४.) वैध नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (Valid Non Creamy Layer Certificate)
- ५.) पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक आणि जर अंतिम वर्षात असेल तर आधीच्या वर्षाची गुणपत्रिका
- ६.) पासबुक
- ७.) डिव्यांग असेल तर दाखला
- ८.) अनाथ असल्यास त्याचा दाखला
Mahajyoti Scheme for UGC NET/ CSIR NET/ MH SET Aspirants/ महा ज्योती मार्फत UGC NET/CSIR NET/MH SET करीता प्रशिक्षण सुविधा
- या प्रशिक्षण करीता Mahajyoti द्वारे ऑनलाईन अर्ज मागवले जातात. या परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ OBC, VJ, NT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थी घेऊ शकतात. हे पूर्वतयारी चे प्रशिक्षण आता मोफत ऑफलाईन आणि ऑनलाईन अनिवासी पद्धतीने सुद्धा देण्यात येते.
या प्रशिक्षण करीता ची संपूर्ण माहिती ही खालील प्रमाणे.
- प्रशिक्षण करीता एकूण विद्यार्थी निवड संख्या = १२००
- प्रशिक्षण कालावधी= ६ महिने
- विद्यावेतन (७५% उपस्थिती असल्यास आणि ऑफलाईन प्रशिक्षण घेत असल्यास)= १०,००० प्रती महिना
- अकास्मिक निधी (ऑफलाईन प्रशिक्षण घेत असल्यास) = १२,०००
- योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता:
- विद्यार्थी महारष्ट्र चा रहिवासी असावा.
- विद्यार्थी हा OBC, VJ, NT किंवा SBC या प्रवर्गातील च असावा.
- विद्यार्थी नॉन क्रिमी लेयर उत्पन्न गटातील असवा.
- विद्यार्थ्याने पदव्युत्तर पदवी चे शिक्षण पूर्ण केलेले आसावे.
- एकदा महा ज्योती योजनेचं लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने पुन्हा अर्ज करू नये आणि अर्ज केल्यास तो ग्राह्य धरल्या जाणार नाही.
- विद्यार्थी यांची अंतिम निवड ही छाननी परीक्षा घेऊनच केल्या जाईल.
- मंजूर विद्यार्थी यांचे अर्ज कमी अलयास पात्रता लक्षात घेऊन संवर्ग नुसार निवड करण्यात येईल.
- दिवयांग व्यक्तींनी ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल.
लाभार्थी विद्यार्थी निवड प्रक्रिया:
- महा ज्योती या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने www.mahajyoti.org.in या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- प्राप्त अर्जांची छाननी करून UGC NET/CSIR NET/MH SET करीता दिलेल्या अभ्यासक्रम वरून चाळणी परीक्षा घेतल्या जाईल.
- चाळणी परीक्षा मधे गुणवत्ता नुसार गुणवत्ता यादी लावून आरक्षित जागा प्रमणे निवड यादी संकेत स्थळावर लावण्यात येईल.
- प्रशिक्षण स्वरूप:
- प्रशिक्षण निवड केलेल्या परीक्षेच्या अभ्यासक्रम वर आधारित असेल.
- प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल.
- प्रशिक्षण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीचे असेल.
- ऑफलाईन किंवा ऑनलाईन प्रशिक्षण निवड विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार करू शकतात. परंतु एकदा निवड केल्यास त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही.
समांतर आरक्षण आणि प्रवर्ग नुसार जागा:
- खाली दिल्याप्रमाणे दिलेल्या प्रवर्ग करीता विद्यार्थी संख्या निवड करण्यात येईल.
- OBC: ५९% (७०८)
- VJ A: १०% (१२०)
- NT B: ८% (९६)
- NT C: ११% (१३२)
- NT D: ६% (७२)
- SBC ६% (७२)
समांतर आरक्षण नुसार:
- प्रवर्ग निहाय महिलांना ३०% आरक्षण असेल.
- डीव्यांग व्यक्तींना ४% जागा आरक्षित असतील.
- अनाथ असल्यास १% जागा आरक्षित असतील.
लाभार्थी विद्यार्थी करीता आवश्यक पात्रता:
- तो विद्यार्थी महारष्ट्र चा रहिवासी असावा.
- तो विद्यार्थी OBC, VJ, NT किंवा SBC प्रवर्गातील च असावा.
- तो विद्यार्थी non creamy layer उतपन्न गटातील असावा.
- त्या व्यक्तीने विहित मुदत मधे PhD साठी registation केलेले असावे.
- जर तो विद्यार्थी खाजगी/सरकारी/निम सरकारी क्षेत्रात नोकरी करत असेल तर त्याने जिथे जॉब करत आहे त्या खात्यातून किंवा उच्च अधिकारी यांच्याकडून तशी परवानगी घ्यावी व ते पत्र सादर करावे.
- अशा विद्यार्थ्यांनी ते पत्र सादर केल्याशिवाय ते कोणत्याही फेलोशीप साठी पात्र ठरणार नाहीत.
- या योजनेत कोणत्याही प्रकारची pay किंवा without pay leaves नसतील.
- या योजनेचा लाभ घेण्यास विद्यार्थी ४५ वर्षे पेक्षा जास्त वय असलेला नसावा.
- या योजनेत distance education mode ग्राह्य धरल्या जाणार नाही.
Fellowship Details/ फेलोशीप संपूर्ण माहिती:
खाली दिल्या प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वेगवेगळी फेलिशिप दिली जाते.
१.) Humanities, Social sciences, sciences engineering & technology: ३१,००० प्रती महिना(पहिले आणि दुसरे वर्ष) MJPJRF,
३५,००० प्रती महिना (तिसरे, चौथे आणि पाचवे वर्ष) MJPSRF
२.) Contingency A, Humanities and social sciences: १०,००० प्रती महिना (पहिले आणि दुसरे वर्ष), २०,५०० प्रती महिना (तिसरे, चौथे आणि पाचवे वर्ष) Contingency B, Sciences engineering & technology: १२,००० प्रती महिना (पहिले आणि दुसरे वर्ष), २५,००० प्रती महिना (तिसरे, चौथे आणि पाचवे वर्ष)
३.) Escorts/reader assistance for all disciplines : २००० प्रती महिना दिव्यांग करीता
४.) HRA for all disciplines: as per government norms. अशा प्रकारे तुम्ही या योजनेची अजून detail माहिती महा ज्योती च संकेत स्थळ www.mahajyoti.org.in या संकेत स्थळावर जाऊन बघू शकता.
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 l पात्रता : 10वी ते पदवीधर l MSC BANK BHARTI 2025